इस्रोच्या ‘नेत्रा’ला केंद्राचे 33 कोटी, प्रस्तावाला लोकसभेची मंजुरी

268

अंतराळातील कचरा तसेच इतर धोक्यांपासून हिंदुस्थानी उपग्रहांना सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल टाकले आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रोच्या नेत्रा प्रणालीला 33.30 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने नुकतीच मंजुरी दिली.

अंतराळातील हिंदुस्थानचे उपग्रह तसेच इतर मालमत्तांच्या रक्षणासाठी सप्टेंबरमध्ये जवळपास 400 कोटी रुपये खर्चून नेत्रा प्रणाली लाँच करण्यात आली. प्रत्येक वर्षी ग्रहांचे काही तुकडे बाहेर फेकले जातात. या तुकडय़ांचा उपग्रहांना धक्का लागण्याची भीती असते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठीच ही प्रणाली लाँच केली गेली. या प्रणालीसाठी 33.30 कोटी रुपये देण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला गेल्या आठवडय़ात लोकसभेने मंजुरी दिली.

सध्याच्या घडीला अंतराळात हिंदुस्थानचे 15 कम्युनिकेशन उपग्रह, 13 रिमोट सेन्सिंग उपग्रह आणि 8 नेव्हिगेशन उपग्रह आहेत. याशिवाय इतर अनेक छोटे उपग्रह आहेत. नेत्रा प्रणालीमुळे हिंदुस्थान, अमेरिका आणि रशिया या देशांप्रमाणेच आपल्या उपग्रहांचे अंतराळातील कचरा तसेच इतर धोक्यांपासून रक्षण करू शकणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या