डायनासोरप्रमाणे मानवजातही नष्ट होईल! इस्रोचे प्रमुख शास्त्र्ाज्ञ डॉ. सोमनाथ यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डायनासोरप्रमाणे एकेदिवशी मानवजातही नष्ट होईल. ही वेळ येण्यास स्वतः मानव जबाबदार असेल किंवा निसर्ग वा अंतराळातून येणारे लघुग्रह जबाबदार असतील, असा धोक्याचा इशारा अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख शास्त्र्ाज्ञ डॉ. एस. सोमनाथ यांनी गुरुवारी एका मुलाखतीत दिला.

मानवाला अंतराळात पाठवण्याची गरज काय आहे? मानवाला राहण्यासाठी पृथ्वी योग्य जागा आहे. मग अंतराळ यात्रा कशासाठी? असा सवाल लोक विचारतात. त्यांनी भविष्यात मानवजातीला असलेला धोका लक्षात घ्यायला हवा, असे डॉ. सोमनाथ म्हणाले. सध्या चंद्र आणि मंगळावर लघुग्रहांचा सतत भडिमार होत आहे. तेथे त्यांना वाचवणारे वातावरण नाही. पृथ्वीवर वातावरण आहे. त्यामुळे आपण आजपर्यंत लघुग्रहांच्या हल्ल्यापासून वाचलो आहोत, परंतु मानव पृथ्वीवर कायमचा राहणार नाही. डायनासोरप्रमाणे मानवजातही नष्ट होईल. पृथ्वीवरील मानवाचे जीवन अत्यंत मर्यादित आहे. जर मानवाने राहण्यासाठी नवीन जागा निवडली नाही तर एक दिवस पृथ्वीचा अंत होईल आणि मानवजातही नष्ट होईल, असा दावा डॉ. सोमनाथ यांनी केला.