इस्रोचे मिशन! 40 मजली महाकाय रॉकेट

इस्रो अर्थात हिंदुस्थानी अंतराळ संस्था तब्बल 40 मजली रॉकेट तयार करणार आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी याबाबतची घोषणा केली असून या महाकाय रॉकेटचे वजन तब्बल 75 टन असेल. हे रॉकेट पृथ्वीच्या खालच्या कक्षेत नेण्यात येणार असून इस्रोची ही कामगिरी ऐतिहासिक ठरणार आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापिठातील दीक्षांत समारंत्रात या नव्या रॉकेटबद्दल माहिती दिली. नारायणन यांच्या या रॉकेटची तुलनात आता डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी तयार केलेल्या रॉकेटशी करण्यात येतेय. रॉकेटची क्षमता तब्बल 2 हजार पटींनी अधिक वजन वाहून नेण्याची असणार आहे.

असे असणार इस्रोचे यंदाचे प्रकल्प

नाविक उपग्रह ः इस्रोचा हा उपग्रह हिंदुस्थानची स्वतःची नेविगेशन प्रणाली असणार आहे. हा एक जीपीएस प्रकल्प आहे. सैन्य आणि नागरिकांना अचूक स्थान आणि वेळ या माध्यमातून जाणून घेता येणार आहे.

एन1 रॉकेट ः हे इस्रोचे नवीन रॉकेट आहे. या रॉकेटबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, भविष्यातील मोहिमांसाठी हे रॉकेट अत्यंत महत्वपूर्ण ठणार आहे.

अमेरिकेचा दूरसंचार उपग्रहः इस्रो आपल्या एलव्हीएम3 रॉकेटच्या माध्यमातून अमेरिकेच्या साडेसहा हजार किलो वजनाच्या ब्लॉक-2 ब्लूवर्ड उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. हा उपग्रह एएसटी स्पेस मोबाईल कंपनीचा असून हा उपक्रम स्मार्टफोन्सना थेट अंतराळातून इंटरनेट कनेक्शन देईल.

टेक्नॉलॉजी डेमोंस्ट्रेशन सेटेलाइट ः हा उपग्रह तंत्रज्ञानाची पडताळणी करेल, जे भविष्यातील मोहिमांसाठी तयार करण्यात येईल.

जीसॅट 7आर ः हिंदुस्थानी सैन्यासाठी हा सैन्य संचार उपग्रह आहे. हा उपग्रह जीसॅट-7 ची जागा घेईल. नौदलाची क्षमता आणखी मजबूत करण्यासाठी या उपग्रहाचा फायदा होईल.