
हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुढील आठवडय़ात 24 डिसेंबरला आपले ब्लूबर्ड-6 रॉकेट लाँच करणार आहे. हे हिंदुस्थानचे पॉवरफूल रॉकेट एलव्हीएम-3 आहे. या रॉकेटला ब्लूबर्ड असे नाव दिले आहे. हे सॅटेलाइट खास टेक्नॉलॉजीवर काम करतेय. याच्या मदतीने जगातील असे एक इंटरनेट बनेल जे थेट स्मार्टफोनशी जोडले जाईल.
ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला 24 डिसेंबर 2025 ला सकाळी 8.54 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ पेंद्रातून एलव्हीएम-3 रॉकेटचे सहावे ऑपरेशनचे उड्डाण केले जाईल. या मिशनचे नवा एलव्हीएम-3एम6 ब्लूबर्ड ब्लॉक-2 मिशन ठेवण्यात आले आहे. हे मिशन पूर्णपणे कमर्शियल मिशन आहे. यात अमेरिकेची कंपनी एएसटी स्पेसमोबाइलचे ब्लूबर्ड ब्लॉक-2 संचार सॅटेलाइट लाँच केले जाईल. हे मिशन इस्रोच्या कमर्शियल शाखा न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) च्या माध्यमातून केले जात आहे. या सॅटेलाइटचे वजन 6.5 टन आहे. याला लो अर्थ ऑर्बिटमध्ये तैनात केले जाणार आहे.
ब्लूबर्ड ब्लॉक-2 सॅटेलाइटची खास वैशिष्टय़े
अमेरिकी कंपनी एएसटी स्पेसमोबाइलकडून बनवण्यात आलेले हे सॅटेलाइट पुढच्या जनरेशनचे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. याचे सर्वात मोठे खास वैशिष्टय़ म्हणजे हे सामान्य स्मार्टफोनला थेट स्पेसने सेलुलर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी करेल. म्हणजेच कोणत्याही अतिरिक्त डिव्हाइस किंवा टॉवरविना फोनमध्ये 4जी आणि 5जी इंटरनेटचा वापर केला जाऊ शकतो. या सॅटेलाइटला जवळपास 2,400 स्क्वॉयर फुटाचा मोठा फेस्ड ऐरे अँटिना आहे जो लो अर्थ ऑर्बिटमध्ये तैनात केला जाईल.

























































