कोरोनावर आयटीसीने बनवला ‘नेजल स्प्रे’,क्लिनिकल चाचणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानला कोरोना लढय़ात यश मिळवून देण्यासाठी आयटीसी कंपनीही पुढे सरसावली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आयटीसी कंपनीने ‘नेजल स्प्रे’ विकसित केला असून सध्या या स्प्रेची क्लिनिकल चाचणीदेखील सुरू करण्यात आली आहे. कंपनीच्या एका प्रवक्त्याने गुरुवारी ही माहिती दिली.

बंगळुरूतील आयटीसी लाइफ सायन्सेस अॅण्ड टेक्नॉलॉजी सेंटरच्या शास्त्र्ाज्ञांनी हा ‘नेजल स्प्रे’ बनवला आहे. आवश्यक त्या सर्व नियामकीय मंजुरी मिळाल्यानंतर हा स्प्रे सेव्हलॉन ब्रॅण्डच्या नावाने मार्पेटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्याची पंपनीची योजना आहे. सध्या या स्प्रेची क्लिनिकल चाचणी सुरू आहे. आम्ही या घडीला याबाबत सविस्तर तपशील जाहीर करू शकत नाही, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीला ‘एथिक्स कमिटी’ची मंजुरी मिळाली असून ‘नेजल स्प्रे’साठी क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री इंडियाकडे नोंदणी करण्यात आली आहे. हा ‘नेजल स्प्रे’ कोरोनावर परिणामकारक असल्याचा दावा केला जात आहे.