आयटीआयच्या 75 व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्किल इंडिया व डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थांमध्ये आता व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात येणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तयार करण्यात आलेल्या 75 व्हर्च्युअल क्लासरूम/ स्मार्टरूमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात राज्यात 75 व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले असून राज्यात एकूण 90 क्लासरूम तयार आहेत. व्हर्च्युअल क्लासरूममध्ये इंटरऑक्टिव पॅनल, संगणक सेवा उपलब्ध आहे. यावेळी काwशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, आयुक्त डॉ. रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांची उपस्थित होते.