गांधीजयंती निमित्त जम्मू-कश्मीरमधील नेत्यांची नजरकैदेतून मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीर प्रशासनाने गांधीजयंतीनिमित्त जम्मूतील काही नेत्यांची नजरकैदेतून मुक्तता केली आहे. जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून येथील काही नेत्यांना नजरकैद करण्यात आले होते. त्यातील नॅशनल काँग्रेस, काँग्रेस, पँथर्स या पक्षातील नेत्यांवरील नजरकैद हटवण्यात आली आहे.

यावेळी माजी मंत्री आणि डोगरा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष चौधरी लाल सिंह यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले होते. पण आता सिंह यांच्यासह नॅशनल कॉन्फ्रेरन्सचे देवेंद्र राणा, एसएस सालाथिया, काँग्रेसचे रमन भल्ला आणि पँथर्स पक्षाचे हर्षदेव सिंह यांच्यावरील नजरकैद हटवण्यात आली आहे. या नेत्यांना 5 ऑगस्टपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते.