
मुंबई शिक्षक मतदारसंघातील उमेदवाराला निवडून आणण्याच्या दृष्टीचे तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा, असे आवाहन शिक्षक सेनेचे प्रातांध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी केले.
मालाडमधील ऑक्सफर्ड स्कूल येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सूक्ष्म नियोजन कसे असावे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी शिक्षक सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱयांच्या चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अभ्यंकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे, सूत्रसंचालन मुरलीधर मोरे तर आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष विशाल बावा यांनी केले.

























































