चित्रपटसृष्टीतील भांडणं चव्हाट्यावर ,लोकं मजा घेत आहेत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

काम करण्याच्या जागी महिलांचे शोषण होणं ही बाब चांगली नाही, त्याचं कधीही समर्थन होऊ शकत नाही, असे अभिनेता जॅकी श्रॉफ याने म्हटले आहे. तसेच ‘मी टू’ मोहिमेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील भांडणं चव्हाटय़ावर आली आहेत. लोक याचा आनंद घेत आहेत, हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ याने दिली आहे.

 ‘द प्लेबॉय मि. साहनी’ या लघुपटाच्या स्क्रीनिंगसाठी जॅकी श्रॉफ  आज उपस्थित होते. त्यावेळी सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘मी टू’ मोहिमेबाबत त्यांना विचारण्यात आले. त्यावर जॅकी यांनी हे सगळे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केलं आहे. एकमेकांची उणीदुणी चव्हाटय़ावर आणली जात आहेत. लोक तमाशा पाहत आहेत ही बाब चांगली नाही असंही जॅकीने म्हटले आहे. काम करण्याच्या जागी महिलांचं शोषण होणं ही बाब चांगली नाही, त्याचं कधीही समर्थन होऊ शकत नाही. लैंगिक शोषण होत असेल तर ते सहन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपल्या सगळय़ांची जबाबदारी ही आहे की आपल्याला महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करावे लागेल, असेही जॅकीने म्हटलंय.