सत्तरी गाठलेला तरुण शिवसैनिक, जयदत्त क्षीरसागरांच्या कामाच्या झपाट्याने भलेभले आवाक

2667

पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. हाती शिवबंधन बांधल्यानंतर क्षीरसागरांची वर्णी मंत्रिमंडळातही लागली. रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय त्यांच्याकडे सोपवण्यात आले. मंत्रीपदी विराजमान होताच त्यांनी जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी झोकून देत असतानाच त्यांनी जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावले आहे. सत्तरी गाठली असली तरी जयदत्त क्षीरसागर हे तरुणाला लाजवेल अशा उत्साहात आणि जोमात कामे पूर्ण करत असतात. त्यांच्या कामाचा आवाका बघून भलेभले थक्क झाले आहेत.

jaidutta-kshirsagar-hd-imag

शिवसेना भाजपचे सरकार हे आपले सरकार आहे अशी लोकांची दृढ भावना झाल्याने ते आपल्या समस्या सोडवण्यासाठी मोठ्या अपेक्षेने जयदत्त क्षीरसागरांकडे येत आहेत. रोज हजारो लोकांना भेटून त्यांच्या समस्या दूर करण्याचा क्षीरसागर प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांना जोडण्याची हातोटी आणि कामाच्या झपाटा ही जयदत्त क्षीरसागरांची ओळख आहे. शिवसेनेची साथ मिळाल्याने जयदत्त क्षीरसागरांमध्येही नवा उत्साह संचारला आहे.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी गावागावांत जाऊन तिथल्या लोकांच्या भेटीगाठी घेणं सुरू केलं आहे. तिथल्या शिवसैनिकांकडून मिळणारा पाठिंबा पाहिल्यानंतर क्षीरसागरांची उमेद वाढली आहे. रात्रीचे एक वाजेपर्यंत ते लोकांची कामे करीत असतात. शेवटच्या माणसाचे जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत ते धडपड करत असतात. बोलणे कमी पण काम जास्त हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. केवळ बीड जिल्हापुरता मर्यादीत न राहता त्यांनी मराठवाडा आणी विदर्भालाही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. वॉटर ग्रिडसारखी योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न सुरू आहे. जातीपातीच्या राजकारणाऐवजी विकासाचे राजकारण करण्याचे क्षीरसागर यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या