
महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून जयजित सिंग तर कोकण परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक म्हणून संजय मोहिते यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश आज राज्याच्या गृहविभागाने जारी केले.
कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांची मुंबई गुन्हे शाखेच्या आर्थिक घोटाळा विभागात सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे राजवर्धन यांची महिला अत्याचार प्रतिबंध, देवेन भारती यांची राज्य सुरक्षा, प्रभात कुमार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तर नवल बजाज यांची पोलीस महासंचालक कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्याशिवाय पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक दर्जाच्या दोन डझन अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.


























































