पर्युषण काळात जैन मंदिरे बंदच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-high-court

कोरोनाचा धोका वाढू नये यासाठी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. त्यातच पर्युषण काळात जैन मंदिर सुरू करण्यास मुभा दिली तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची जास्त शक्यता आहे राज्य सरकारचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी जैन धर्मियांना दिलासा देण्यास नकार दिला व पर्युषण काळात मंदिर सुरू ठेवण्याची मागणी फेटाळून लावली.

लग्नासाठी ५० तर अंतिम विधी साठी वीस ते तीस जणांना परवानगी देण्यात आली आहे, याठिकाणी संसर्ग होण्याची शक्यता असतानाही परवानगी देण्यात आली आहे. मग जैन धर्मियांना देवदर्शनासाठी बंदी का, असा सवाल करत भांडुपमधील रहिवासी अंकित वोरा यांनी अॅड. प्रपुâल्ल शहा यांच्यामार्पâत याचिका दाखल केली. 15 ते 23 ऑगस्ट दरम्यान येणाऱ्या पर्युषण सोहळ्यात जैन मंदिर खुली करण्याची व पुजा करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर न्यायामूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने अॅड. पूर्णिमा कंथारिया यांनी बाजू मांडली. युक्तिवाद करताना त्यांनी कोर्टाला सांगितले की मंदिर सुरू केल्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ शकतो. त्यामुळे प्राण हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर हायकोर्टाने राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिकाकत्र्यांची मागणी फेटाळून लावली व सुनावणी तहकूब केली.

यावर्षी दहीहंडी नाही

हायकोर्टाने सुनावणीवेळी याचिकाकत्र्यांना दहीहंडीचे उदाहरण दिले. तुम्ही काल पाहिले असाल, तर कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रस्त्यावर एकही दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. कोविडसाठी आखण्यात आलेली मार्गदर्शक तत्वामध्ये राज्य सरकार बदल करेल त्यावेळी तुमच्या मागणीचा निश्चितच विचार केला जाईल. सप्टेंबरपर्यंत थांबा. अशा सूचना हायकोर्टाने याचिकाकत्र्यांना केल्या.