जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस गोळीबार प्रकरण – आरोपी चेतन सिंह बडतर्फ

जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस (Jaipur-Mumbai Central Superfast Express) गोळीबार प्रकरणातील आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह चौधरी (वय – 33) याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. 31 जुलै रोजी जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये चेतन सिंह चौधरी याने गोळीबार केला होता. या गोळीबारमध्ये तीन प्रवाशांसह एएसआय टिकाराम मिना (Tikaram Meena) यांचाही मृत्यू झाला होता.

चेतन सिंह चौधरी (Chetan Singh Chaudhary) याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली असून सध्या तो ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद आहे. या गोळीबार प्रकरणी त्याची चौकशी सुरू असून आता त्याला सेवेतूनही बडतर्फ करण्यात आले आहे. 14 ऑगस्ट रोजी आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी चेतन याला बडतर्फ केले.