युरोपने पाकिस्तानातील लोकशाही कमकुवत केली- जयशंकर

पाकिस्तानातील सैन्याला पाठिंबा देऊन तेथील लोकशाही कमकुवत करण्याचे काम पश्चिमेकडील शक्तिंनी केल्याचा आरोप परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केला. जयशंकर यांचा रोख अमेरिका आणि युकेकडे होता. डेन्मार्कच्या पोलिटिकेन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मते मांडली. 1947 नंतर पाकिस्तानने सातत्याने कश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, परंतु संपूर्ण युरोप त्यांच्या सैन्याशी खांद्याला खांदा लावून उभा राहिला, असा आरोपही जयशंकर यांनी केला.