2 मोबाईल चोरांकडून 33 मोबाईल हस्तगत, गुन्हे शाखेची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

जालना शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोबाईल चोरणारे 2 अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड घातले. सागर बबन ढाकणे, अतीश रंजीत आडसुळ (रा. संभाजीनगर जालना) या दोघांकडून पोलिसांनी 3 लाख 55 हजार 47 रूपये किंमतीचे 33 मोबाईल हस्तगत केले आहे. जालना शहरातील बसस्थानकात एकाने नवीन मोबाईल खरेदी केला होता. त्यास सागर ढाकणे व अतिश आडसुळ यांनी अडवून, मारहाण करून, त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावून घेतला. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक  गौर व त्यांच्या पथकाने सागर व अतिश या दोघांना ताब्यात घेऊन विचारपुस केली. त्यावेळी त्यांनी बसस्थानक जालना येथे एका जणास अडवून झुडपात नेऊन त्याच्याजवळील मोबाइल व रक्कम हिसकावून घेतल्याची कबुली दिली. तसेच गर्दीच्या ठिकाणी बसस्थानक, आठवडी बाजार, मंदिरं आदि ठिकाणाहून चोरलेले विविध कंपनीचे 33 मोबाईल पोलिसांनी जप्त केले.