जालना जिल्ह्यातील देहेड येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील देहेड येथील शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे आपल्या शेतामधील बाभळीच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे. गणेश गंजीधर बावस्कर (27) असे गळफास घतेलेल्या तरुणाचे नाव आहे. घटना 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मॉर्निंग वाकिंगला जाणाऱ्या मुलांना बाभळीच्या झाडाला मृतदेह लटकताना निदर्शनास आला.

गावकऱ्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली पोलिसांना घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृत्यूदेह खाली काढण्यात आला. भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना तसेच शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली असून शेतामध्ये पेरणी केलेल्या पिकांचा खर्च देखील निघणार नसल्याने तसेच सतत होत असलेल्या नापिकीमुळे गणेश बावस्कर यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. गणेश बावस्कर यांच्यावर देहेड येथील स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे देहेड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास भोकरदन पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या