जालन्यात मान्सून बरसला, मुसळधार पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्या चतकासारखी वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना आज वरुणराजाने खुष केले. दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. प्रचंड वेगाने पडलेल्या पावसाने जालना शहरातील रस्त्यावर पाणी वाहू लागले होते.

पावसाळ्यातील पहिलाच पाऊस जालना जिल्ह्यात आज दुपारच्या सत्रात झाला. दीड वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेती कामाला वेग येणार आहे. शेतकरी जूनच्या पहिल्याच आठवड्यात शेतीची मशागत करून मोकळा झाला आहे, परंतु पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी थांबला होता, परंतु आजच्या पडलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांची लगबग पुन्हा सुरू झाली आहे.

जालना शहरातील गांधी चमन, रेल्वे स्थानक रोड, भाग्यनगर, शनी मंदिर, कचेरीरोडवरून तुडुंब पाणी वाहत होते. सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसाने काही वेळा नंतर विश्रांती घेतली. मात्र झालेल्या पावसाने वाहनधारकांची चांगलीच दमछाक केली.