जालन्यातील  सराटी शिवारातील ऊसाच्या शेतीला आग, दीड लाख रुपयांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी शिवारात उसाच्या पीकाला भीषण आग लागली. या आगीत जवळपास 1 एकर ऊस जळुन खाक झाला आहे. त्यामुळे दीड लाखांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अंतरवाली सराटी शिवारातील गट क्रं. 214 मध्ये शेतकरी वैजनाथ भिकाजी घुले यांनी जवळपास 1 एकर क्षेत्रावर गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ऊसाची लागवड केली होती. शॉर्टसर्कीटमुळे ऊसाला आग लागली. ही  आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी खुप प्रयत्न केले. परंतु आगीच्या रुद्रवतारच एवढा भयानक होता की या अवतारापुढे ग्रामस्थांचा उपयोग झाला नाही.संपूर्ण ऊस जळून जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

सध्याच्या परिस्थितीत जळालेल्या ऊस जनावरांना चारा म्हणून कोणी विकत घेत नाही. तसेच ऊसावर काढलेले कर्ज कसे फेडायचे व तसेच खत मशागतीचा खर्च निघाला नसल्याने या चिंतेने शेतकरी चिंताग्रस्त होऊन हवालदिल झाला आहे.