
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शेवगा फाट्यावर हायवा या अवजड वाहनाने अचानक पेट घेतला. हायवा जळून खाक झाल्याने 35 लाखांचे नुकसान झाले असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द येथील प्रणित हर्षे यांच्या मालकीचा हायवा ट्रक हा तिर्थपुरी-भोजगाव या रस्त्यावर शेतकऱ्यासाठी मळी घेऊन जात होता. परंतु दुपारी २ वाजेच्या दरम्यान हायवाच्या समोरील कॅबिनने अचानक पेट घेतला. हा पेट इतका भयानक होता की, हायवाचा फक्त लोखंडी पत्रा शिल्लक राहिला आहे. ज्यामध्ये हायवाचे अंदाजे नुकसान हे 32 ते 35 लाख रुपयांचे झाले आहे. या आगीमुळे रस्त्याच्या कडेला असेलेले लिंबाचे झाडही होरपळून गेले आहे. या घटनेचा गोंदी पोलीसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

































































