
जळगाव, भुसावळ, रावेर, धरणगाव, फैजपूर, जामनेर, चोपडा, पाचोरा येथील स्वॉब घेतलेल्या 92 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज बुधवारी 13 मे रोजी प्राप्त झाले आहेत. यापैकी 82 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये आठ व्यक्ती भुसावळ येथील तर दोन व्यक्ती या जळगाव शहरातील आहेत. भुसावळ येथील व्यक्तीमध्ये तलाठी कॉलनी, भज्जेगल्ली, जाम मोहल्ला, लाल बिल्डींग, आयेशा कॉलनी, खडकारोड या ठिकाणच्या 3 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. तर जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागातील एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 209 इतकी झाली असून त्यापैकी एकोणतीस व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे. तर पंचवीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

































































