वरणगाव शिवारात मृताअवस्थेत बिबट्या आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। जळगाव

भुसावळ तालुक्यातील वरणगाव शिवारात रविवारी दुपारी 4 वर्षीय बिबट्या मृतावस्थेत आढळला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

वरणगाव शिवारातील मन्यारखेडा नाल्याजवळ अनिल पाटील रा. फुलगाव यांची केळीची बाग आहे. या केळीच्या बागेजवळून जात असताना काही मेंढपाळांना हा नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला.

त्यानंतर मेंढपाळांनी शेतकरी पाटील यांना याबद्दल यांना सांगितले. त्यांनी याबद्दल वनविभागाला कळवले. त्यानंतर वनविभागाचे दिपाली जाधव, मुकेश बोरसे वानखेडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी मयत बिबट्याच्या तोंडातून रक्त येत होते. पशुवैद्यकिय अधिकारी तडवी यांनी घटनास्थळी मयत बिबट्याचे शवविच्छेदन केले. शेतकरी पाटील यांचे वरणगाव शिवारात गट क्रमांक 692 मध्ये केळीचे शेत आहे व शेताच्या खाली मोठा नाला आहे. यामुळे पाणी पिण्याच्या उद्देशाने आलेल्या बिबट्याची शिकार झाली की एखाद्या वाहनाचा मोठा फटका लागल्याने बिबट्याचा मृत्यू झाला याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.