
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पोखरी इजारा येथे सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या पाणीपुरवठा टाकीचे सेंट्रींग कोसळून दोन मजूर जखमी झाले. यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून रोष व्यक्त केला. कंत्राटदार व अभियंत्यावर गुन्हे नोंदवा अशी मागणी केली आहे.
पोखरी येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. टाकीच्या स्लॅबकरिता ठोकण्यात आलेली सेंट्रींग कोसळून भरत वाघे, शेख चाँद (दोघे रा. दिग्रस) हे गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा पाय मोडला असून त्याला तत्काळ पुसद येथे भरती करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.




























































