
जालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून सलग पूर्व मान्सून जोरदार कोसळत असून यामुळे शेती कामांना वेग आले आहे. तर काही ठिकाणी ओढे, नाल्यांना पाणी आले असून शेतशिवार चांगले भिजले आहे. त्यामुळे कृषी केंद्रावर शेतकरी गर्दी करतांना दिसत आहे. भोकरदन तालुक्यातील केळना नदीला पुर आला आहे.
आज दुपार तीन वाजेच्या दरम्यान गडगडाटासह टपोरी थेंबांचा मारा करीत पाऊस धो-धो कोसळला. त्यामुळे शहरातील रस्त्यावरुन पाण्याचे लोंढेच वाहत होते. दरम्यान आजपासून जिल्हा अॅनलॉक झाल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तसेच शेती अवजारे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शहरातील बाजारपेठेत गर्दी केली होती. भोकरदन तालुक्यातील मौजे आव्हानासह परिसरात दुपारी 2:30 वाजता समाधान कारक पाऊस पडला. त्या पावसामुळे आव्हाना येथील केळणा नदीला पूर आला असून केळनेला पुर आला असून त्यामुळे मंगळवेढा येथील केळणा नदीवर बांधलेल्या बंधारा तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे आव्हाना येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.





























































