जालन्यात महावितरणच्या विद्यूत खांबाचा शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एका 12 वर्षांच्या मुलाचा नाहक बळी गेल्याची घटना जालना शहरातील नूतन वसाहत परिसरातील राहुल नगरमध्ये घडली आहे. सूर्यकांत उर्फ मोनू सर्जेराव म्हस्के अस मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

मोनू हा मंगळवारी सायंकाळी राहुल नगर परिसरातील गल्लीत खेळत असताना त्याचा अचानकपणे महावितरणाच्या विद्यूत खांबाला हात लागला. खांबामध्ये विजेचा प्रवाह उतरलेला असल्याने मोनूला विजेचा शॉक लागल्याने तो पोलला चिकटला. नागरिकांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालय दाखल केले असता. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

राहुल नगर परिसरात विद्यूत खांबामध्ये गेल्या दोन दिवसांपासून विद्यूत प्रवाह उतरत असल्याची माहिती नागरिकांनी महावितरणला दिली होती. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोनूचा दुर्देवी मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.