जालना – संचारबंदीचे उल्लंघन, भाजीपाल्याची खुलेआम विक्री; पोलिसांनी केली कारवाई

जालना शहरात 5 जुलैपासून संचारबंदी लागु करण्यात आलेली असून या नियमांचे कुणीही उल्लंघन करु नये, यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. परंतु या संचारबंदीही भाजीपाला-फूल विक्रेते मानत नसल्याने संचारबंदीचे उल्लंघन करीत आहेत. अशा विक्रेत्यांवर सदर बाजार पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संचारबंदी लागु करण्यात आली असली तरीही शहरातील छोट्या-मोठ्या भागात नागरिक व टवाळखोर एकत्र जमवून गप्पा मारत असतात. पोलीसांच्या सायरनचा आवाज येताच जमाव आपआपल्या घरात जातात. पोलीस जाताच पुन्हा गर्दी जमते. अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

अवघे जग कोरोना विषाणुचा सामना करीत आहे. अनेकांचे या महामारीमुळे प्राण गेले आहेत. कोरोना रोगाने जिल्हाभरातही थैमान घातले असून आजपर्यंत 42 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही हजारापुढे सरकली आहे. या पावबंद घालण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवित आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणुचा फैलाव रोखत नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुन्हा 5 जुलैपासून संचारबंदी-लॉकडाऊन लागु केला खरा. मात्र काही रिकामटेकडे, भाजीपाला, दुकानदार याचे सर्रास उल्लंघन करीत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कडक पाऊले उचलण्यात आले असून आज 14 जुलै रोजी जालना शहरात संचारबंदी असतांना भाजीपाला -फुले विक्री करणाऱ्यांवर सदर बाजार पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

पोलीस येताच गर्दी गायब पोलीस जाताच पुन्हा गर्दी शहरातील विविध ठिकाणच्या वस्त्यांमध्ये नागरिक एकत्र जमवून लॉकडाऊनचे उल्लंघन करीत आहे. तसेच शहरातील संजयनगर, गांधीनगर, इंदिरानगर, लक्कडकोट, कन्हैयानगर भागातही छुप्या पध्दतीने दुकाना चालू ठेवून चढ्या भावाने माल विक्री करीत आहे. अशावरही पोलीसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी होत आहे. दरम्यान या भागात पोलीसांचा राऊंड येताच जमाव आपआपल्या घरात पळतात व पोलीस जाताच पुन्हा गर्दी होत असल्याने कोरोना विषाणुला एकप्रकारे निमंत्रणच म्हणावे लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या