जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथे दावणीला बांधलेल्या एका बैलासमोर सलग 20 मिनिटे नाग फणा काढून बसला केला. मात्र बैल जराही न घाबरता मोठ्या तोऱ्यात खंबीरपणे नागासमोर उभा होता. समोर फणा काढून डोलणाऱ्या नागाचा जराही या बैलावर परिणाम झाला नाही. काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये ही घटना कैद केली.
View this post on Instagram
अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथील शेतकरी सोनाजी जाधव यांच्या शेतातील बखारीसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बैलाला बांधण्यात आले होते. या ठिकाणी बैल चारा खात असताना त्याच्यासमोर अचानक पाच फूट लांबीचा नाग आला आणि फणा काढून उभा राहिला. या नागोबाने बैलाला घाबरवण्याचा देखील प्रयत्न केला. तब्बल 20 मीनिटं नाग बैलासमोर फणा काढून बसला होता. पण बैल काही डगमगला नाही. त्यानंतर नागाने माघार घेत तेथून धूम ठोकली. ही घटना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.


























































