जालना – ट्रॅक्टरखाली दबल्याने शेतकऱ्यासह चालक ठार

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील टाका येथील शेतात रोटाव्हेठर चालवण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असतांना ड्रेनमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्यासह चालकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. शेतकरी रावसाहेब बढे व चालक निसान बाबु शेख अशी मृतांची नावे आहेत.

पाऊस उघडल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी वेग घेतला तसेच रब्बी हंगामातील गहू पेरणीसाठी लगबग सुरू आहे. ही लगबग सुरू असल्यामुळे अंबड तालुक्यातील टाका येथील शेतकरी रावसाहेब किसन बढे (60) तर ट्रॅक्टर चालक निसान बाबु शेख हे रावसाहेब बढे यांच्या शेतात रोटाव्हेटर चालवण्यासाठी टँक्टर घेऊन चालले होते. गावापासुन काही अंतरावर वसंतराव म्हस्के यांच्या शेताजवळ येताच ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्यावर पलटी मारुन रस्त्याकडील ड्रेनमध्ये जावून पडला.

घटनेची माहिती मिळताच आसपास शेजारील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दबलेल्या दोघांनाही
बाहेर काढून उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या