जालन्यातून हत्यारे जप्त

32

सामना प्रतिनिधी। जालना

पोलीस दलाच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी जालना शहरात कोंबींग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये 8 तलवारी, 2 गुप्ती, 1 कत्ती, 1 कोयता पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर करण्यात आली.

शहरात दिवसभर प्रमुख पोलीस अधिकार्‍यांसह 150 पोलीस कर्मचार्‍यांनी विविध भागात कोंबीग ऑपरेशन केले. त्यामध्ये कैकाडी मोहल्ल्यात सुभाष पवार यांच्या घरी 3 तलवारी व 1 गुप्ती, मंगळबाजार भागात दिनेश भगत यांच्या घरातून 3 तलवारी, नरेश भगत यांच्या घरातून 1 तलवार, कैलास मेघावाले यांच्या घरातून 1 तलवार, 1 गुप्ती, व पोलास गल्लीतील सरफराज खान यांच्या घरातून 1 कत्ती व 1 कोयता जप्त करण्यात आले. याबाबत रात्री उशिरापर्यत गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलिस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे पो.नि. यशवंत जाधव, पो.नि. साईनाथ ठोंबरे, पो.नि. बाळासाहेब पवार, पो.नि. महादेव राऊत, पो.नि. किशोर बोर्डे यांच्यासह पथकातील 150 पोलिस कर्मचार्‍यांनी पार पाडली.

आपली प्रतिक्रिया द्या