जालन्यातील दावलवाडी शिवारातील घटना, शेतकरी युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दावलवाडी शिवारात 8 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास गट क्रमांक 189 मध्ये लिबांच्या झाडाला गळफास घेऊन शेतकरी युवकानी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. बद्री कल्याणराव घनघाव असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

बदनापूर तालुक्यातील शेतकरी युवक बद्री कल्याणराव घनघाव (31) रा. सायगाव (डोगंरगाव) हा 7 मे सांयकाळी 6 वाजेपासून मोटारसायकल क्र. (एम.एच. 21 बी एन 6501) बजाज कंपनी सीटी 100 वर बसून घरातून निघून गेला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी पोहचला नाही. म्हणून शोधाशोध सुरु केली मात्र मिळून आला नाही.

सकाळी 10 वाजेच्या सुमारास दावलवाडी शिवारातील पदमाकर दाजीबा शिंदे रा. दावलवाडी यांच्या मालकीच्या शेतामध्ये एका लिबांच्या झाडाला अनोळखी इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजताच सदरील मयत शेतकरी युवक बद्री घनघाव (रा.सायगाव) येथील असल्याचे समजले.

तेव्हा घटनास्थळी नातेवाईकांनी ओळख पटल्यानतंर शेलगाव येथील प्राथामिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, साहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे, पो.हे.कॉ. मांन्टे, चरणसिंग बम्हांवत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे सायगाव डोगंरगाव गावात शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या