पोदार शाळेकडून फ्रीस्टाईल फुटबॉलरचे आयोजन

पोदार इंटरनॅशन स्कूलच्या विद्यार्थ्यांना आनंददायी क्षण अनुभवायला मिळाले, जेथे ते मुंबईला पहिल्यांदाच भेट दिलेला जगातील टॉप 10 फुटबॉल फ्रीस्टाईलर्सपैकी एक असलेला जेमी नाईटसाठी होस्ट बनले. जेमी जगातील सर्वात अनुभवी आणि सर्वाधिक मागणी असलेला प्रोफेशनल फूटबॉल फ्रीस्टाईलर आहे. तो खेळावर अधिक प्रमाणात लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रख्यात खेळाडू व प्रशिक्षकांकडून सर्वोत्तम कार्यशाळा व प्रशिक्षण सत्रे मिळण्यासाठी पोदार एज्युकेशन नेटवर्कच्या उपक्रमाचा भाग म्हणून हिंदुस्थानला भेट देत आहे.

जेमी फुटबॉलवरील त्याच्या सर्वोत्तम नियंत्रणासाठी ओळखला जातो आणि त्याने जगभरात प्रवास करत प्रसिद्ध जागतिक ब्रॅण्ड्ससोबत सहयोग केला आहे. त्याने युरो 2020साठी अधिकृत जागतिक मास्कटची भूमिका बजावली आहे आणि 2017 व 2018मध्ये बॅक-टू-बॅक यूईएफए चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये मैदानावर अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याच्या सातत्यपूर्ण आणि बारकाईने अवलंबलेल्या काwशल्यामुळे त्याचे जगभरात मोठय़ा प्रमाणावर चाहते आहेत.

जेमीचा विश्वास आहे की, फ्रीस्टाईल फुटबॉलिंग शारीरिक व मानसिक आरोग्य विकसित करण्यामध्ये मदत करते आणि सकारात्मक मानसिकतेच्या महत्त्वाबाबत माहिती देते. यामधून पोदार एज्युकेशन नेटवर्कचा सर्वांगीण शिक्षणाप्रति पाठिंबा अधिक प्रबळ होतो.  विद्यार्थ्यांनी दाखवलेली उत्सुकता पाहून आनंदित झालेला जेमी नाईट म्हणाला, “पोदारच्या विद्यार्थ्यांमध्ये एवढा उत्साह, प्रतिभा आणि खेळाबद्दलची आवड पाहून खूप आनंद झाला. हिंदुस्थान फुटबॉलच्या खेळात जागतिक स्तरावर उत्तम कामगिरी करू शकतो आणि फुटबॉल विश्वचषकात लवकरच भाग घेईल, अशी आशा आहे.