जामखेडमध्ये 2 नवे रुग्ण आढळल्याने हॉटस्पॉट केंद्राची मुदत 6 मेपर्यंत वाढविली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात 2 किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केला आहे. बुधवारी जामखेड शहरात आणखी 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात 6 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री आदी 6 मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून याआधी जामखेड हॉटस्पॉट केंद्राची मुदत 1 मेपर्यंत वाढविण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने गुरुवारी नव्याने आदेश काढून त्यात आणखी वाढ करीत 6 मेपर्यंत ती वाढविली आहे. कंट्रोल रुममध्ये रजिस्टर ठेवून त्यामध्ये नोंदी घेण्यात याव्यात व नागरीकांना आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तू सशुल्क पुरविण्यात याव्यात. तसेच प्राप्त होणार्‍या सर्व तक्रारींचे निरसन करण्यात यावे. पोलिसांनी सर्व रस्ते बंद करून एकच रस्ता बॅरिकेटद्वारे खुला ठेवावा, असे आदेशात म्हटले आहे.