
सीना नदीवरील बंधाऱयात मासे पकडण्यासाठी गेलेले चुलता आणि पुतण्या पाण्यात वाहून गेल्याची घटना चौंडी परिसरात सोमवारी सायंकाळी घडली होती. 12 तासांच्या शोधकार्यानंतर या दोघांचे मृतदेह सापडले आहेत. तुषार गुलाबराव सोनवणे (वय 22) व सतीश बुवाजी सोनवणे (वय 43, दोघे रा. चौंडी, ता. जामखेड) अशी मृतांची नावे आहेत.
तुषार आणि सतीश हे सोमवारी सायंकाळी सीना नदीतील बंधाऱयात मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही वाहून गेले होते. पाण्याचा वेग व अंधार यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होत होता. अखेर 12 तासांनंतर दोघांचेही मृतदेह सापडले आहेत.



























































