
जामखेडमधील 7 व पाथर्डीमधील 1 असे एकूण 8 जण कोरोनाबाधीत रुग्ण सध्या बुथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून ते बरे होईपर्यंत जर नगर जिल्ह्यात रुग्ण सापडला नाही तर जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकेल. दरम्यान, काल संगमनेर तालुक्यातील एका वृद्धाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा अहवाल आल्यानंतर तो पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण रुग्णांची संख्या 45 झाली असून त्यातील तिघांचा मृत्यू झालेला आहे, तर 34 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
अजून जामखेडचे 7 व पाथर्डीचा एक असे आठ जण उपचार घेत आहेत. नगर शहरात आतापर्यंत 9 जण कोरोनाबाधीत रूग्ण सापडले होते. ते आता सर्व बरे झाले आहेत. त्यात तीन परदेशी व दोन परप्रांतीय होते. नगर तालुक्यात 3 जण रूग्ण आढळले होते ते तिघेही बरे झाले आहेत. सर्वाधिक रुग्ण जामखेडमध्ये आढळले ही संख्या 17 असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण बरे झाले असून सात जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. संगमनेर तालुक्यात 9 रुग्ण आढळले त्यातील 8 जण बरे झाले आहेत. पैकी चार जण नेपाळी होते. तर काल एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्याचा अहवाल आल्यानंतर तो पॉझिटीव्ह असल्याचे समजले. नेवासा तालुक्यात तीन रुग्ण आढळले होते. ते तिघेही बरे झाले आहेत. राहाता तालुक्यात एक रुग्ण आढळला होता. तो बरा झाला आहे.
कोपरगाव तालुक्यात एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. तिचा मृत्यू झाला आहे. पाथर्डी तालुक्यात मागील आठवड्यात एक रूग्ण आढळला. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तो वाशी येथे शेवग्याच्या शेंगा विकण्यास गेला असता त्याला कोरोना झाला. शेजारील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक जण नेवाशात पाहुण्यांकडे आला असता त्याला पाहुण्यांकडून कोरोनाचा संसर्ग झाला. श्रीरामपुर तालुक्यातील गतिमंद तरुणाचा पुण्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र तो पुण्यात इतर आजाराची ट्रिटेमेंट घेण्यास गेला असता त्याला पुण्यात कोरोनाची लागण झाली.



























































