वैष्णो देवी मंदिर परिसरात भीषण आग लागली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मूच्या कटरा येथील वैष्णो देवी मंदिर परिसरात भीषण आग लागली आहे. मंदिराच्या आवारात असलेल्या कालिका भवनजवळ काउंटर क्रमांक दोन जवळ ही आग लागली आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणाहून नैसर्गिक गुहा शंभर मीटर अंतरावर आहे. भैरव घाटी पर्यंत या आगीचे लोळ दिसत आहेत. व्हीआयपी गेटजवळील काउंटिंग रूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.