
जम्मू कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला तर एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
सोपोर मधील मोडेल टाऊन परिसरात गस्त घालणाऱ्या नाका पार्टीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. या गोळीबारात एक जवान शहीद झाला तर तीन जवान जखमी झाले. काही सामान्य नागरिकही जखमी झाले असून त्यातील एका मृत्यू झाल्याची माहिती, जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली.






















































