#JammuKashmir अवंतीपुरा येथे सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक

जम्मू कश्मीरच्या अवंतीपुरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा कमांडर आणि दोन दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचं वृत्त आहे.

याच आठवड्यात मंगळवारी अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांशी सुरक्षा दलांची चकमक झाली होती. या चकमकीत हिंदुस्थानी सैन्याचा एक जवान आणि एक पोलीस अधिकारी शहीद झाले होते. तर या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं होतं. आता पुन्हा याच भागात ही चकमक सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या