बालाकोटमध्ये चकमक, सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
terrorist

जम्मू कश्मीरच्या बालाकोट येथे सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलांकडून राबवण्यात आलेल्या शोधमोहीमेत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अद्याप शोधमोहीम सुरू आहे.

बालाकोट येथील सीमा बाड परिसरात गस्तीवर असणाऱ्या सैनिकांना काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी शोधमोहीम राबवून दोन दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधून काढला आणि त्यांना कंठस्नान घातलं. या परिसराला घेराव घालण्यात आला असून अद्याप देखील शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

राजौरी परिसरात झालेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांनंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सीमाभागातही बीएसएफने ऑपरेशन सर्द हवा नावाची मोहीम राबवली आहे. त्या अंतर्गत 24 तास सीमांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे सांबा परिसरात प्रशासनातर्फे सीमेच्या एक किमीच्या परिसरात रात्रकालीन कर्फ्युही जारी करण्यात आला आहे.