जम्मू-कश्मीरमध्ये स्फोटात जवान शहीद

372

जम्मू-कश्मीरच्या अखनूर जिल्ह्यातील पल्लनवाला प्रांतातील नियंत्रण रेषेजवळ रविवारी आयईडी स्फोटात लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हे जवान लष्कराच्या ट्रकमधून प्रवास करीत होते. स्फोटात गंभीर दुखापत झाल्याने तिघांना उधमपूर येथील लष्कराच्या रुग्णालयात नेले होते. तेथे हवालदार संतोषकुमारची प्राणज्योत मालवली.

संतोषकुमार हा आग्य्राच्या पुरा भदौरिया गावातील रहिवासी आहे. इतर दोन जवानांची प्रकृती नाजूक असून लष्कराच्या रुग्णालयातील डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्यावर उपचार करीत आहे. स्फोट झाला त्या परिसरात राष्ट्रीय रायफल्सच्या पथकांनी सुरक्षा दलातील अधिकाऱयांच्या बरोबरीने बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, हा स्फोट कोणी घडवला हे अजून उघड झालेले नाही. लष्करातर्फेही या स्फोटाबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पाकडय़ांकडून पुन्हा गोळीबार
राजौरी जिल्ह्यातील नौशेरा प्रांतातील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने रविवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने हिंदुस्थानच्या दिशेने स्वैर गोळीबार केला. त्याला हिंदुस्थानी जवानांनी गोळीबारातूनच चोख प्रत्युत्तर उत्तर दिले.

आपली प्रतिक्रिया द्या