कश्मीरातील जवानांना 40 हजार बुलेटप्रूफ जॅकेटस्! ‘एके-47’च्या गोळ्या झेलण्याची क्षमता

711

जम्मू-कश्मीरात अतिरेक्यांशी लढणाऱ्या लष्कराच्या जवानांसाठी अत्यंत दणकट असे 40 हजार बुलेटप्रूफ जॅकेटस् पाठविण्यात आले. या जॅकेटस्मध्ये एके-47 रायफल्सच्या गोळय़ा झेलण्याचीही क्षमता आहे.

गेल्या वर्षी संरक्षण मंत्रालयाने जवानांसाठी अत्याधुनिक व वजनाला हलके असे बुलेटप्रूफ जॅकेटस् पुरविण्यासाठी एसएमपीपी या कंपनीला 639 कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. कंपनीला एकूण 1.86 लाख जॅकेटस्चा हा सौदा असून संरक्षण खात्याने कंपनीला त्यासाठी 2021 पर्यंतची मुदत दिली आहे, मात्र आम्ही हा सौदा 2020 पर्यंतच पूर्ण करू असे कंपनीच्या वतीने मेजर जनरल अनिल ओबेरॉय यांनी सांगितले. कंत्राटानुसार कंपनीला पहिल्या खेपेत 36 हजार जॅकेटस् पुरवायची होती, मात्र कंपनीने त्यापेक्षा अधिक जॅकेटस्चा पुरवठा केला आहे.

दणकट, मजबूत…
एसएमपीपी कंपनीने बनवलेले हे जॅकेटस् बोरॉन कार्बाईड सिरॅमिकपासून बनविण्यात आलेले आहेत. वजनाला अतिशय हलके असलेले हे जॅकेट शरीराला संपूर्ण संरक्षण देईल. युद्ध तसेच दहशतवाद्यांविरोधात राबविण्यात येणाऱया कोम्बिंग ऑपरेशनमध्येही हे जॅकेट वापरता येणार आहे. वेगवेगळय़ा भागांत बनविण्यात आलेले असल्यामुळे हे वापरण्यासाठी चांगले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या