
श्रीनगरमध्ये 1990 मध्ये हिंदुस्थानी हवाई दलाच्या कर्मचाऱयांवर गोळीबार करून चौघांना ठार करणारा मुख्य हल्लेखोर जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटचा म्होरक्या यासिन मलिक हाच होता अशी साक्ष एका महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सीबीआयच्या विशेष कोर्टात आज दिली.
श्रीनगरजवळील रावळपोरा येथे 25 जानेवारी, 1990 रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका स्क्वाड्रन लिडरसह हवाई दलाचे चार कर्मचारी ठार झाले होते आणि 22 जण जखमी झाले होते. यासिन मलिक सध्या तिहार जेलमध्ये आहे.

























































