उघडले नंदनवनाचे द्वार, कश्मीर उद्यापासून पर्यटकांसाठी खुले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jammukashmir-1

 कश्मीरमधून अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना माघारी पाठकिण्याबाबत गृह किभागाने जारी केलेला  आदेश जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मागे घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजाकणी येत्या 10 ऑक्टोबरपासून होणार आहे. त्यामुळे नंदनवनाचे द्वार पुन्हा खुले होणार असून पर्यटकांना दिकाळीच्या सुट्टय़ांचा आनंद तिथे घेता येईल. कलम 370 रद्द केल्यानंतर पर्यटक पहिल्यांदाच कश्मीरला जाणार आहेत.

जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम-370 रद्द करण्याच्या तीन दिवस आधी 2 ऑगस्ट रोजी एक सूचना जारी करून राज्यातील सर्व पर्यटकांना तत्काळ माघारी परतण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात कुणीही पर्यटक फिरकला नव्हता. राज्यपालांच्या सूचनेनुसार आता गुरुवारपासून संबंधित ऍडव्हायजरी मागे घेतली जाणार असून अशी सूचना गृह विभागाला करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून थंडावलेला कश्मीरमधील पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा बहरणार आहे.

राज्यपालांनी घेतला सुरक्षेचा आढावा 

राज्यपाल मलिक यांनी जम्मू-कश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीला विशेष सल्लागारांसह राज्याचे मुख्य सचिव तसेच योजना व गृहनिर्माण, नगरविकास विभागाचे प्रधान सचिवही उपस्थित होते. बैठकीत ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (बीडीसी) निवडणुकीबाबत अधिकाऱयांनी राज्यपालांना माहिती दिली. बीडीसी निवडणुका घेऊन जास्तीत जास्त अध्यक्ष निवडी पूर्ण करण्यात येतील, असेही अधिकाऱयांनी सांगितले.

हॉटेल व्यावसायिकांना सवलती

जम्मू-कश्मीरमध्ये पर्यटनाला प्रेरणा देण्यासाठी जास्त हॉटेल आणि रिसोर्ट सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे, असे राज्यपाल मलिक यांनी सांगितले. अनेक हॉटेल मालक येऊन हॉटेल बंद असल्याचे सांगतात. त्यांनी हॉटेल सुरू करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे.  त्यांना व्याजदरात सवलत देण्यात येणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.