महत्त्वाच्या बातम्या- जपानची हिंदुस्थानी आंब्यांच्या आयातीवर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील तणावामुळे हिंदुस्थानातील आंबा उत्पादक शेतकरी आधीच संकटात सापडला असताना आता जपानने हिंदुस्थानी आंब्यांच्या आयातीवर अचानक बंदी घातली आहे. भारतात दरवर्षी सुमारे 24 दशलक्ष मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी साधारण 3200 मेट्रिक टन आंबा परदेशात निर्यात केला जातो.

कॅनडामध्ये हिंदुस्थानी विद्यार्थिनीची हत्या

कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. विधी कल्पेशभाई मेघानी (22) असे मृत तरुणीचे नाव असून ती गुजरातच्या आणंदमधील बोरसदची रहिवासी होती. शिक्षणासोबत ती नोकरीही करत होती. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला आहे.

पाटण्यातील गंगेत बोट उलटल्याने तिघांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यातील बाढ येथील गंगेत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर चार जण बेपत्ता झाले आहेत. मच्छीमारांनी आणि स्थानिक पाणबुड्यांनी गंगेत उडी मारून 7 जणांना वाचवले. बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. या बोटीत 15 लोक होते. यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश होता. 3 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही.