
चीनमधील सर्व जपानी कंपन्या मायदेशी परतणार आहेत. यासंदर्भात जपान सरकारने निर्णय घेतला असून, ड्रगनला मोठा औद्योगिक आणि आर्थिक दणका बसला आहे. विशेष म्हणजे चीनमधून मायदेशी परतण्याचा कंपन्यांचा सर्व खर्च जपान सरकार उचलणार आहे.
‘ब्लुमबर्ग’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. जपान आणि चीनमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर जपानने हा निर्णय घेतला आहे. कोरोना हा चीनी व्हायरस असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चीनविरोधात जगभर रोष आहे. यापूर्वी अमेरिकेने चीनविरुद्ध आर्थिक लढाई सुरु केली. हिंदुस्थाननेही चीनबरोबरचे रेल्वे कंत्राट रद्द केले. 59 ऍप्सवर बंदी घातली. जपानने मोठे पाऊल उचलताना आपली चीनमधील गुंतवणूकच मायदेशी नेण्याचा निर्णय घेतला आहे.
आशियातील अनेक देश एकवटले
चीनच्या विस्तारवादी आणि कुरापतखोर धोरणाविरुद्ध आशियातील अनेक देशांनी चीनला औद्योगिक फटका देण्याची तयारी सुरू केली आहे. व्हिएतनाम, म्यानमार, थायलंड यांच्यासह पूर्व आशियाई देशांनी आपल्या कंपन्या चीनमधून बाहेर नेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
57 कंपन्या मायदेशी परतणार
जपानच्या 57 कंपन्या चीनमध्ये आहेत. यासर्व कंपन्या जपानमध्ये पसरतील.
जपानच्या निक्केइ वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार जपानी कंपनी चीन सोडून मायदेशी आल्यानंतर त्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी जपान सरकार 53.6 कोटी डॉलर्सची मदत कंपन्यांना करणार आहे.
चीनचे परराष्ट्र आणि व्यापार धोरण सहकार्य करण्याच्या दृष्टीने काम करत नाही. शेजारी देशांची अडवणूक करण्याचे काम करते, असा आरोप जपानने केला आहे.



























































