लग्न करा, संसार थाटा मिळवा सवाचार लाख रुपये!

आशियाई देशातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना जपानला मात्र वेगळ्याच चिंतेने ग्रासले आहे. जपानमध्ये जन्मदराच्या तुलनेत मृत्युदर वाढल्याने सरकार आता युवकांना लग्न करून संसार थाटण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. लग्न करा, संसार थाटा आणि सरकारकडून सवाचार लाख रुपये अनुदान मिळवा अशी अनोखी योजना जपानने अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील जनसंख्या वाढीचा समतोल राखण्यासाठी जपान सरकारने हा आगळा फंडा अमलात आणण्याचे ठरवले आहे.

जपानची एकूण लोकसंख्या सध्या 12.68 कोटी इतकी आहे. गेल्या वर्षात जपानमध्ये विक्रमी संख्येत 8 लाख 65 हजार बालकांचा जन्म झाला. पण जन्माच्या तुलनेत 5 लाख 12 हजार नागरिकांचा मृत्यूही झाला. त्यामुळे लोकसंख्यावाढीचा समतोल कमी होईल अशी भीती जपानी राजकारण्यांना वाटू लागली आहे. नव्या अनुदान योजनेमुळे देशातील बालकांचा जन्मदर नक्कीच वाढेल असा सरकारला विश्वास आहे. जपान हा बुजुर्गांचा म्हणजे अधिक वय असलेल्या नागरिकांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे देशात युवकांची संख्या वाढवण्यासाठी सरकार नवनवे प्रयोग अमलात आणत आहे. त्याचाच भाग म्हणून युवकांना लग्न करायला आणि संसार थाटून देशाची लोकसंख्या वाढवायला प्रोत्साहित करणे हा नव्या अनुदान योजनेचा मुख्य हेतू आहे.

नवा संसार थाटा, योजनेसाठी काय आहेत अटी
जपान सरकारने नवा संसार थाटा आणि अनुदान मिळवा,या योजनेसाठी काही अटी युवकांसाठी ठेवल्या आहेत. लग्न करणाNया जोडप्याचे वय 40 वर्षांपेक्षा अधिक नसावे. दोघांची एकूण कमाई 38 लाख रुपयांच्या वर नसावी. ज्या नवयुगुलांचे वय 35 हुन कमी असेल त्यांची कमी 33 लाख रुपयांहून जास्त नसावी. या अटी पाळणाNया नवविवाहित जोडप्यांना सरकार संसार थाटण्यासाठी 2.11 लाख रुपये अनुदान देणार आहे. जपानमध्ये झालेल्या 2015च्या सव्र्हेत केवळ आर्थिक सुबत्ता नसल्याने 20 ते 25 वर्षे वयोगटातील 38 टक्के जपानी युवक आणि 18 टक्के जपानी युवती लग्न व संसारापासून दूर राहत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळेच देशाच्या लोकसंख्या वाढीचा मेरू मंद झाल्याचे जपान सरकारचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या