
जपानच्या नवनिर्वाचित पंतप्रधान साने ताकाची यांनी पदभार स्वीकारताच मोठा निर्णय घेतला आहे. स्वतःसह सरकारमधील सर्व मंत्र्यांचे पगार व भत्त्यांमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव त्या संसदेत आणणार आहेत.
‘जपान टाइम्स’च्या वृत्तानुसार, मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्द्य़ावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. ताकाची यांच्या प्रस्तावानुसार, खासदार म्हणून मिळणाऱ्या पगाराव्यतिरिक्त पंतप्रधान आणि पॅबिनेट मंत्र्यांना मिळणारे सर्व अतिरिक्त भत्ते तात्पुरते स्थगित केले जाणार आहेत.


























































