जसखारजवळ आग लागून ट्रक भस्मसात

325

वीजेच्या तारांना स्पर्श होऊन लागलेल्या आगीमध्ये एक ट्रक भस्मसात झाल्याची घटना न्हावाशेवा येथील जसखार गावाजवळ घडली.

गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एक ट्रक लोखंडी माडण्या घेऊन निघाला होता. मात्र रस्ता चुकून हा ट्रक न्हावाशेवा पोलीस ठाण्याजवळच्या रस्त्यावर आला. रस्त्याच्या वरून गेलेल्या वीजेच्या तारांचा चालकाला अंदाज न आल्याने ट्रक मधील लोखंडी मांडण्याना या वीज तारांचा स्पर्श झाला आणि त्यातून पडलेल्या ठिणग्यांमुळे या ट्रकने पेट घेतला.

सुदैवाने ट्रक चालकाने गाडीतून उडी टाकल्याने तो वाचला. या आगीत ट्रक जळून खाक झाला. या बाबत न्हावा शेवा पोलिस ठाण्यात आकस्मिक आग म्हणून नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या