बुमराह क्रिकेटमधील ‘लंबी रेस का घोडा’ नाही, दिग्गज गोलंदाजाने सांगितले कारण

2787

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात हिंदुस्थानचा हुकुमाचा एक्का आहे. बुमराहच्या वेगळ्या ऍक्शनमुळे आणि वेगवान यॉर्करमुळे त्याचा सामना करणे फलंदाजांना कठीण जाते. मात्र याचमुळे त्याची क्रिकेट कारकीर्द जास्त लांबणार नाही, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केले आहे. हिंदुस्थानचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा यासोबत बोलताना त्याने हे विधान केले आहे.

बुमराह याने कसोटी क्रिकेटमध्ये देखील आपली कला दाखवली हे त्याचे कौशल्य आहे. तो खूप मेहनती मुलगा आहे. त्याला माहिती आहे आपल्याला काय हवं आहे, मात्र यादरम्यान त्याची पाठ त्याला साथ देईल? कधीपर्यंत त्याची पाठ हा भार उचलत राहील? असा सवाल शोएब अख्तर याने केला.

मी त्याचे अनेक सामने पाहिले आणि त्याच्या बॉलिंग ऍक्शनमुळे तो कढीपर्यंत खेळणार, एकदिवस त्याची पाठ त्याला साथ देणार नाही, असेही मी मित्रांना सांगितले असे शोएब म्हणाला. तसेच त्याचा रनअप छोटा असला तरी बॉल डिलिव्हर होताना त्याचा पाय ज्या पद्धतीने पडतो ते पाहता तो लंबी रेस का घोडा होणे शक्य नाही, असेही तो म्हणाला. तसेच त्याला सावधान राहण्याची आवश्यकता असून कर्णधाराने देखील क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात त्याला खेळवावे अथवा नाही यावर विचार करावा असेही शोएब यावेळी म्हणाला.

बुमराहने टीम इंडिया कडून आतापर्यंत 14 कसोटी, 64 एक दिवसीय आणि 49 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावावर अनुक्रमे 68, 104 आणि 59 बळींची नोंद आहे. तसेच आयपीलमध्येही तो खेळत असून आतापर्यंत 77 लढतीत 82 बळी त्याने घेतले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या