
नेहरू मेमोरियल म्युझियम अॅण्ड लायब्ररीच्या नावातून नेहरू काढून पंतप्रधान म्युझियम अॅण्ड लायब्ररी असे केल्याप्रकरणी विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला केला. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. पंडीत जवाहरलाल नेहरूंची ओळख त्यांचे नाव नाही तर त्यांचे कर्तृत्व आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
राहुल यांच्या या टीकेला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उत्तर दिले आहे. आम्ही माजी पंतप्रधानांचा सन्मान करत आहोत, मग ते कुठल्याही पक्षाचे असू देत. काँग्रेस पार्टी उगाचच या मुद्दय़ाला उचलून धरत आहे. नाव बदलल्यामुळे काय अडचण निर्माण झाली हेच मला समजत नाही, असे जोशी यांनी म्हटले आहे.



























































