
बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन तब्बल सात वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. पुनरागमनसाठी त्यांनी बॉलीवूडऐवजी चक्क मराठी सिनेमाची निवड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आगामी मराठी सिनेमात जया बच्चन झळकणार आहेत. मार्चपासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून अवघ्या 20 दिवसांत शूटिंग पूर्ण केले जाणार आहे. जया बच्चन यांनी मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. 2012 साली जया बच्चन या रितुपर्णा घोष यांच्या ’सनग्लास’ या चित्रपटात नसीरुद्दीन शहासोबत झळकल्या होत्या. मात्र काही कारणात्सव हा चित्रपट रिलीज झाला नव्हता.


























































