
गद्दार आणि पन्नास खोके, एकदम ओके हे वाक्य इतपं झोंबतं की, त्यामुळे न्यायालयात जावं लागतं, याचा अर्थ काही ना काही झालेलं आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिंधे गटाला हाणला. हे वाक्य कुणीच उच्चारू नये, अशी व्यवस्था न्यायालयीन मार्गाने सुरू आहे, असेही ते म्हणाले.
पन्नास खोके, एकदम ओके आणि गद्दार म्हटल्यावरून मिंधे गटाचे एक खासदार दिल्ली उच्च न्यायालयात गेले आहेत. यावर जयंत पाटील म्हणाले की, हे वाक्य काही लोक मनाला लावून घेत आहेत. आपण काही केलं नसेल तर ते वाक्य आपल्यासाठी नाही असं त्यांनी समजावं. पण, हे वाक्य इतपं झोंबतं की, त्यासाठी न्यायालयात जावं लागतं. याचा अर्थ काही ना काही झालेलं आहे. हे वाक्य कोणीच उच्चारू नये, अशी व्यवस्था न्यायालयीन मार्गाने केली जात आहे, असेही पाटील म्हणाले.
























































